वाचन प्रेरणा दिन
"वाचन प्रेरणा दिन" दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी भारतातील शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये साजरा केला जातो. हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. डॉ. कलाम यांचे जीवनच एक प्रेरणा असून त्यांना वाचनाची विशेष आवड होती. त्यांचे विचार आणि कार्य विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी सतत प्रेरित करत राहतात.
या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात जसे की पुस्तक प्रदर्शने, वाचन स्पर्धा, वाचन चळवळीबाबत मार्गदर्शन, आणि प्रेरणादायी पुस्तकांचे सादरीकरण. वाचनामुळे विद्यार्थ्यांचे विचारशक्ती, सृजनशीलता आणि भाषिक कौशल्य वृद्धिंगत होते.
"वाचन प्रेरणा दिन" हे फक्त एक दिवसाचे आयोजन नसून, आयुष्यभर ज्ञानसंपादनासाठी वाचनाची सवय लागावी हा यामागचा खरा उद्देश आहे.
महत्त्व
- वाचनामुळे माणसाचा दृष्टिकोन व्यापक होतो.
- कल्पनाशक्ती आणि भाषिक कौशल्य वृद्धिंगत होते.
- ज्ञान, मूल्ये, आणि विचारधारा आत्मसात करण्याचा मार्ग मिळतो.
- आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य वाढते.
वाचन प्रेरणा दिनाचे प्रमुख उद्दिष्टे
- विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे.
- पुस्तकांचे महत्त्व पटवून देणे.
- डिजिटल युगात वाचनाच्या सवयीस प्रोत्साहन देणे.
- विचारशील नागरिक घडवण्याची प्रक्रिया बळकट करणे.
उपक्रम
आमच्या कॉलेजमध्ये दरवर्षी "वाचन प्रेरणा दिन" निमित्त खालील उपक्रम राबवले जातात:
- पुस्तकप्रदर्शन आणि पुस्तकवाचन सत्र
- वाचन स्पर्धा / रचनात्मक लेखन स्पर्धा
- प्रेरणादायी पुस्तकांवर चर्चा व सादरीकरण
- पुस्तक दान उपक्रम
- शिक्षक व विद्यार्थ्यांच्या आवडत्या पुस्तकांवर अनुभव शेअरिंग
संदेश
"आज एक पान वाचा – उद्या एक नवा विचार उगम पावेल."
वाचन ही केवळ सवय नसून ती एक संस्कृती आहे – जी विद्यार्थ्यांमध्ये घडविणे हेच वाचन प्रेरणा दिनाचे खरे उद्दिष्ट आहे.
ऑनलाईन वाचन कट्टा
मराठी साहित्याच्या विविध प्रकारांवरील ऑनलाइन ई-पुस्तकांच्या वेबसाइट्सची यादी
| ई-पुस्तकांचे प्रकार | वेबसाइट लिंक |
|---|---|
| कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके | Matrubharti |
| कथा, काव्य, व्यक्तिचित्रण, समीक्षा, नाटके | Marathi Sahitya |
| ऐतिहासिक, आत्मचरित्र, धार्मिक, सामाजिक, ललित साहित्य | MarathiPDF |
| शैक्षणिक, ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक, भाषाशास्त्र | Libgen (Library Genesis) |
| कविता, कथा, कादंबऱ्या, आरोग्य, अध्यात्म, पाककृती, शैक्षणिक | Parissparsh |
| ऐतिहासिक, शब्दकोश, बालसाहित्य, विश्वकोश | Discover Maharashtra |
| कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके, प्रवासवर्णन, अध्यात्म, बालसाहित्य, ऑडिओबुक्स | eSahity |
| ऐतिहासिक, धार्मिक, शैक्षणिक, विविध प्रकारचे साहित्य | Internet Archive (Marathi) |
| विविध प्रकारचे मराठी पीडीएफ पुस्तके | ePustakalay |
| शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक ई-पुस्तके | साहित्य मराठी (महाराष्ट्र शासन) |
